{"product_id":"waiting-for-shiva-unearthing-the-truth-of-kashis-gyan-vapi-2","title":"Waiting for Shiva: Unearthing the Truth of Kashi'S Gyan Vapi","description":"\u003cp\u003eज्या सहजतेने काशी किंवा वाराणसी आपल्या इतिहासाचे प्रचंड ओझे वाहते, तशी जगातील फार थोडी ठिकाणे असतील. ही नगरी आपल्या संस्कृतीच्या आत्म्याचे आणि शतकानुशतके आलेली विपरीत परिस्थिती, हल्ले सहन करूनही पुन्हापुन्हा उभी राहत आपल्या अपराजित वृत्तीचे दर्शन घडवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'प्रतीक्षा शिवाची - काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध' या पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हेविश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंदिराच्या इतिहासातील या प्रलयंकारी घटनांचा लेखाजोखा 'प्रतीक्षा शिवाची' हे पुस्तक मांडते. जुलमी मुघल बादशाह औरंगजेबाने १६६९ मध्येया मंदिरावर घातलेला घाव वर्मी बसला आहे. त्याने मंदिर फोडले आणि मंदिराच्या पश्चिमेकडील अर्धवट तुटलेल्या भिंतीवर घुमट उभे करून त्याला मशिदीचे रूप दिले. आज ज्याला ज्ञानवापी मशीद म्हणतात ती मशीद आणि त्याच्या आजूबाजूची आणि अठराव्या शतकात बांधल्या गेलेल्या नव्या विश्वनाथ मंदिराजवळची जागा यावरून नेहमीच वादंग माजलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"None","offers":[{"title":"Livre numérique Kobo","offer_id":46825885860050,"sku":"b4cd213c-67ff-3964-a3ad-27d80c74fdfe","price":15.99,"currency_code":"CAD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0655\/8980\/5233\/files\/image_4d944b1e-4dea-4cc8-aa8c-018e717e8036.jpg?v=1778209496","url":"https:\/\/www.indigo.ca\/fr\/products\/waiting-for-shiva-unearthing-the-truth-of-kashis-gyan-vapi-2","provider":"Indigo","version":"1.0","type":"link"}