करू लागले कविता
शब्द झाले माझे आप्त
आयुष्याच्या संध्याकाळी
जीवनाला अर्थ प्राप्त!
अष्टाक्षरी नि अभंग
हायकू अन् गझल
विविध काव्यप्रकार
छान अलक वाचाल!
'शुभारंभ' 'उपरती'
'माझे गाव' 'वारकरी'
'सत्य' 'सबला' 'भरारी'
'थंडी गुलाबीच बरी'!
'कविता' 'जीवनगाणे'
'बालपण' 'आठवणी'
'असं सुंदर माहेर '
'लेक' 'मैत्रीण' 'पाहुणी'!